माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आल्या.
मात्र मला आयसोलेशन करण्यात आलेल्या वार्डमध्ये मी स्वत:साठी टाईमटेबल बनविला. त्यात मी वाचन, रुममध्येच वॉक, यु-टयूबवरील सकारात्मक व्हिडिओचा समावेश होता. या काळात मी कटाक्षाने कोरोनासंबंधित नकारात्मक बातम्या किंवा अन्य साहित्य वाचले नाही. कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचे मी वाचले. त्यामुळे मला हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचं मी काटेकोरपणे पालन केले. माझ्या आजारादरम्यान मला जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात आले.