दिलासा ! पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत लक्षणीय घट; 2 महिन्यांत एकही मृत्यू नाही

सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (21:52 IST)
कोरोनाच्या (Coronavirus) महामारीनंतर अनेक लोक हतबल झाली. या महामारीनंतर म्युकरमायकोसिस (Pune Mucormycosis) या संसर्गाने पुणे (Pune) जिल्ह्यात जोर धरला. हळूहळू करत म्युकरमायकोसिस बाधित रुग्णात झपाट्याने वाढ झाली होती. एप्रिल (April) महिन्यात तर या रुग्णांची संख्या देखील वाढली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि शासनाची चिंता वाढली होती. परंतु, गेल्या काही दोन महिन्यामध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच मुख्यतः म्हणजे मागील दोन महिन्यांत म्युकरमायकोसिसने एकही रुग्ण दगावला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
 
ज्या माणसाला कोव्हिडची (Covid) बाधा झाली आहे. रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना म्युकर मायकोसिसची लागण होताना दिसत आहे. तसेच, ऑक्‍सिजनवर (Oxygen) उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील हा संसर्ग होताना दिसत आहे. हा आजार संसर्गजन्य नसला, तरी लागण झाल्यानंतर उपचार वेळेत घेतले नाही तर धोकादायक ठरू शकतो. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात या आजाराचे 11 रुग्ण आढळून आले, तसेच, 6 जण या आजाराने दगावले. जून महिन्यात सर्वाधिक 44 रुग्ण आढळले तर 3 जणांचा मृत्यु झाला. आजतागायत ग्रामीण भागात एकूण 79 म्युकर मायकोसिसचे (Mucor mycosis) रुग्ण आढळले आहेत. तर, त्यामधील 9 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 66 रुग्ण बरे झालेत. तसेच, चार जणांवर उपचार सुरू आहे.
 
या दरम्यान, जुलै (July) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता होती,
परंतु, ग्रामीण भागात एकही नवीन बाधित रुग्ण आढळला नाही. तसेच, एकाही रुग्णाच्या मृत्यूची
नोंद न झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा दिसून आला आहे. दरम्यान, यानंतर पूर्ण (जुलै) महिन्यामध्ये 5 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर ऑगस्ट (August) महिन्यात देखील 18 तारखेपर्यंत 5 बाधित रुग्णांची नोंद झालीय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती