राज्यात 22 हजार 543 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (08:37 IST)
राज्यात रविवारी 22 हजार 543 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 416 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 हजार 549 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 10 लाख 60 हजार 308 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी 7 लाख 40 हजार 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 69.8 टक्के झालं आहे.
 
सध्या राज्यात 2 लाख 90 हजार 344 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 29 हजार 531 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.79 टक्के इतका आहे.
 
मुंबईत रविवारी दिवसभरात 2085 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 41 जण दगावले आहेत. त्यामुळे एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 69 हजार 693 इतका झाला आहे. 
 
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 16,83,770 जण होम क्वारंटाईन असून 37,294 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 52,53,676 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 10,60,308 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती