चिंताजनक पुण्याच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने मुंबईला मागे टाकले

शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:46 IST)
पुण्याच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने मुंबईला मागे टाकले आहे. मुंबईत शुक्रवारी  दिवसभरात ८ हजार ८३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुण्यात  १० हजार ९६३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर पुण्यात १०९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि १० हजार २८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
 
पुण्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९६ हजार ९३३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ८६ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९९ हजार ४३१ जणांवर उपचार सुरू आहेत.
 
दरम्यान  पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ५२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७७ हजार ९३४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ५३ हजार ६१० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
मुंबईत शुक्रवारी  ८ हजार ८३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आतापर्यंत नोंद करण्यात आलेली रुग्णांची संख्या ५ लाख ६१ हजार ९९८ इतकी झाली आहे. मुंबई रुग्णसंख्येसोबतच मृत्यूसंख्याही वाढत आहे. मुंबईत आज ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी मुंबईत ९ हजार ३३ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती