राज्यात ५१ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू

रविवार, 14 जून 2020 (09:25 IST)
राज्यात शनिवारी कोरोनातून बऱ्या झालेल्या १५५० जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची  एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. 
 
आज कोरोनाच्या  ३४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १ लाख ०४ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१६.३ टक्के ) आले आहेत. राज्यात ५ लाख ८३ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५८० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७९ हजार ७४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात ११३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद  झाली आहे.नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ८७ (मुंबई ६९, ठाणे ३, नवी मुंबई ८, पनवेल ६, कल्याण-डोंबिवली १), पुणे- १९ (पुणे १०, सोलापूर ८, सातारा १), औरंगाबाद-३ (औरंगाबाद ३), लातूर -३ (लातूर २, नांदेड १), अकोला-१ (यवतमाळ १).
 
नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७३ पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६५ रुग्ण आहेत तर ३८  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या ११३ रुग्णांपैकी १० रुग्णांच्या इतर अतिजोखमीच्या आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही.  उर्वरित १०३ रुग्णांपैकी ८३ जणांमध्ये ( ८०.६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३८३० झाली आहे. 
 
नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ७३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  २७ मे ते १० जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४० मृत्यूंपैकी मुंबई १९, नवी मुंबई -८, सोलापूर -४, ठाणे -३, पनवेल -३, कल्याण डोंबिवली – १, पुणे -१ आणि सातारा १ मृत्यू  असे आहेत. 
 
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (५६,८३१), बरे झालेले रुग्ण- (२५,९४७), मृत्यू- (२११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,७६३) 
ठाणे: बाधीत रुग्ण- (१७,३०६), बरे झालेले रुग्ण- (६८१८), मृत्यू- (४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,०६२)
पालघर: बाधीत रुग्ण- (२२१६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४५४) 
रायगड: बाधीत रुग्ण- (१७८१), बरे झालेले रुग्ण- (११४८), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६७) 
नाशिक: बाधीत रुग्ण- (१८५२), बरे झालेले रुग्ण- (११७०), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८०) 
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०) 
धुळे: बाधीत रुग्ण- (३५३), बरे झालेले रुग्ण- (१९९), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७) 
जळगाव: बाधीत रुग्ण- (१६३३), बरे झालेले रुग्ण- (६५३), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६०) 
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४) 
पुणे: बाधीत रुग्ण- (११,७२२), बरे झालेले रुग्ण- (६५६७), मृत्यू- (४६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६८६) 
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१७३८), बरे झालेले रुग्ण- (६५४), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५६) 
सातारा:  बाधीत रुग्ण- (७३१), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८४) 
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६९२), बरे झालेले रुग्ण- (५२१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६३) 
सांगली: बाधीत रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (११४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००) 
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४) 
रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (३९२), बरे झालेले रुग्ण- (२५६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२१) 
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२५६०), बरे झालेले रुग्ण- (१४००), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०३२) 
जालना: बाधीत रुग्ण- (२५८), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६) 
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२३६), बरे झालेले रुग्ण- (१८४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१) 
परभणी: बाधीत रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०) 
लातूर: बाधीत रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७) 
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०) 
बीड: बाधीत रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२३) 
नांदेड: बाधीत रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७) 
अकोला: बाधीत रुग्ण- (९९०), बरे झालेले रुग्ण- (५०९), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४०) 
अमरावती: बाधीत रुग्ण- (३३५), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१) 
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९) 
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१) 
वाशिम: बाधीत रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३) 
नागपूर: बाधीत रुग्ण- (९८२), बरे झालेले रुग्ण- (५३९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१) 
वर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६) 
भंडारा: बाधीत रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११) 
गोंदिया: बाधीत रुग्ण- (६९), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१) 
चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०) 
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९) 
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०) 
एकूण: बाधीत रुग्ण-(१,०,४५६८), बरे झालेले रुग्ण- (४९,३४६), मृत्यू- (३८३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टीव्ह रुग्ण-(५१,३७९)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती