राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात Recovery Rate हा ४३.३८ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत.