कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान मांडला आहे. लाख प्रयत्न करुन देखील संक्रमण आटोक्यात येत नाहीये. या दरम्यान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की सध्या अनेक लोक आवश्यकता नसून देखील सीटी स्कॅन करवत आहे. यामुळे नुकसान होण्याची शक्यता नकारता येत नाही कारण याने आपण स्वत:ला रेडिएशनच्या संपर्कात आणत आहात. याने नंतर कर्करोग होण्याची शक्तया उद्भवते.
गुलेरिया यांनी म्हटलं की घरी उपचार घेत असलेल्यांनी स्टेरॉइड घेऊ नये. माइल्ड लक्षणं असल्यास स्टेरॉइड दिलं जातं. मॉडरेट आजारात तीन प्रकारे उपचार होतं. सर्वात आधी ऑक्सिजन द्यावी, ऑक्सिजन देखील औषध आहे. नंतर स्टेरॉइड देऊ शकता. होम आयसोलेशनमध्ये राहणार्यांनी सतत डॉक्टरांशी संपर्क राखावा. सेचुरेशन 93 किंवा याहून कमी होत असल्यास, बेशुद्ध होणे किंवा छातीत वेदना जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.