राज्यात ५,३६९ नवीन रुग्णांची नोंद

सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:34 IST)
राज्यात रविवारी ५,३६९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,८३,७७५ झाली आहे. राज्यात १,२५,१०९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ११३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४४,०२४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ११३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २५, नवी मुंबई मनपा ५, उल्हासनगर मनपा २, जळगाव ३, पुणे २४, सोलापूर ७, सातारा ४, सांगली ११ आणि नागपूर ८ यांचा समावेश आहे. रविवारी ३,७२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण १५,१४,०७९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९२ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,२४,८७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८३,७७५ (१८.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,४४,७९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,२३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती