दिलासादायक बाब, ४ लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल

सोमवार, 25 मे 2020 (11:22 IST)
देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून याचा सामाना करण्यासाठी प्रयत्न सुरुच. दरम्यान, देशात करोनाविरोधातील लस तयार करण्यावरही वैज्ञानिक काम करत असाताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात १४ ठिकाणी करोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी ४ लस चाचणीच्या टप्प्यात असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
 
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी संवाद साधताना‍ दिलेल्या माहितीनुसार पाच महिन्यांच्या आत ४ लसींचं क्लिनिकल ट्रायल केलं जाऊ शकतं. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.
 
संपूर्ण जग करोनाची लस शोधण्याचे प्रयत्न करत आहे. तसेच १०० पेक्षा अधिक जण यावर काम करत आहेत आणि हे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती