आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. सध्या कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 15 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आणखी 19 प्रयोगशाळांची निर्मिती सरकारकडून केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
दिल्लीतील पीडित जवळपास 66 लोकांच्या संपर्कात आला होता. आग्रा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाली असल्याची निष्पन्न झालं आहे. तसंच तेलंगणामधील प्रकरणीत पीडित 88 लोकांच्या संपर्कात आला होता. दरम्यान देशभरात एकूण 28 जणांना करोनाची लागण झाली असून यामधील तिघांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्यात सुधारणा झाली असल्याचं यावेळी हर्षवर्धन यांनी सांगितलं.