राज्यात १ हजार ५५३ नवीन करोनाबाधित आढळले

शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (22:31 IST)
राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. शिवाय, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. शनिवारी राज्यात १ हजार ६८२ रूग्ण करोनामधून बरे झाले, तर १ हजार ५५३ नवीन करोनाबाधित आढळले. याचबरोबर, २६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१६,९९८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३८ टक्के एवढे झाले आहे.
 
आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,८९,९८२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९७६० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०९,०९,९९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८९,९८२(१०.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३४,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण २९,६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती