पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1998 मधील पोखरण अणुचाचणीस विरोध केल्याचे खंडन केले आहे. अणुकरारानंतर भारतावर लादण्यात आलेल्या प्रतिबंधासाठी सरकारवर टीका केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यासोबतच अण्वस्त्रप्रसारबंदी संबंधातील उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातून अणुकरारावर वक्तव्य केले होते, असे त्यांनी विश्वासमत ठरावावरली चर्चेदरम्यान स्पष्ट केले.
याअगोदर राज्यभसेतील विरोधी पक्षनेते म्हणून मनमोहन सिंग यांनी पोखरण अणुचाचणीस विरोध केला होता, अस वक्तव्य केले. आपण नेमके काय वक्तव्य केले होते यासाठी नोंदी पडताळू शकता, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.