राजकीय नाट्याबाबत अमेरिकेतही औत्सुक्य

भाषा

सोमवार, 21 जुलै 2008 (15:24 IST)
मनमोहन सिंग सरकारच्या भवितव्यावर अणुसहकार्य कराराचे अस्तित्व अवलंबून असल्याने विश्वासमतनाट्याने अमेरिकेचेही लक्ष वेधले आहे. अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतातील घडामोडींवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

मात्र भारतीय अमेरिकन समुदायातील नेत्यांना भारताच्या अंतर्गत राजकारणात रस नसून मात्र देश व देशहिताच्या दृष्टिकोनातून ते घटनेकडे बघत आहेत. लोकसभेतील मंगळवारच्या विश्वासमत ठरावावरील निकालाकडे संपूर्ण जग उत्सुकतेने बघत असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.

सच्चे नेते राजकीय विचारसरणी व पक्षीय राजकारणापेक्षा राष्ट्रहितास अधिक प्राधान्य असते, असे यूएसआयएनडीआयए फोरमचे अध्यक्ष अशोक मँगो यांनी ई-मेल वरून सांगितले.

चीनने अमेरिकेसोबत भारतापेक्षा वीसपट अधिक व्यापार केल्यास डाव्यांचा त्यास विरोध नाही, मात्र अमेरिका-भारत सहकार्यातून भारतास फायदा होत असेल तर त्यास डावयांचा विरोध आहे.

डाव्यांची भूमिका अतार्किक आहे. सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याच्या जवळ मंगळवारी देश मार्गक्रमण करेल, याबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा