पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत विश्वासमत ठराव जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आलेल्या मनमोहन सिंग सरकारने बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.
यासाठी लोकसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून पंतप्रधानांनी लोकसभेत ठराव मांडून चर्चेस सुरूवात केली आहे. पंतप्रधानांनी लोकसभेत हास्यमुद्रेने प्रवेश करताना न्यूजरूमकडे विजयी चिन्ह दाखवून अभिवादन केले.
यानंतर बोलताना लोकसभेत विश्वासमत जिंकू, असे ठामपणे सांगितले. सार्वत्रिक निवडणुकीनंतर (2004) सपुआ सरकार सत्तारूढ झाल्यापासून मनमोहन सिंग यांना पहिल्यांदाच विश्वासमतास सामोरे जावे लागत आहे.