कॉमनवेल्थ गेम्सच्या नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर नागरिकांचा रोष आहे. त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब झाल्याची भावना सामान्यांमध्ये आहे. असाच एक अनुभव कलमाडींना दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये आला.
कलमाडी आपल्या काही मित्रांसह दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले होते. या दरम्यान या रेस्टॉरंटमध्ये जेवन घेत असलेल्या काही तरुणांनी कलमाडी यांना घेरत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली.
तुम्ही देशाचा पैसा खाण्यात खर्च करत असल्याचे आरोप या तरुणांनी त्यांच्यावर केले. यानंतर रेस्टॉरंट मधील इतर ग्राहकांनीही कलमाडींविरोधात या तरुणांची साथ दिली. कलमाडींच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण मिटले.