खेळ ग्रामच्या व्यवस्थेवर 46 देश खूश

वेबदुनिया

बुधवार, 29 सप्टेंबर 2010 (11:09 IST)
खेळ ग्राममध्ये असलेल्या दुरावस्थांविषयी प्रश्‍नचिन्ह कायम असतानाच भारताच्या व्यवस्थेवर 46 देश जाम खूश असल्याचा दावा गेम्सच्या नियोजन समितीने केला आहे.

ग्राममध्ये मोठ्‍या प्रमाणावर अव्यवस्था असल्याचा आरोप केला जात असून, अनेक भारतीय खेळाडूंनाही याची प्रचिती आली आहे.

नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. खेळ ग्रामच्या व्यवस्थेवर गेम्ससाठी दाखल झालेल्या 46 देशांच्या खेळाडूंनी आनंद जाहीर केल्याचे नियोजन समितीचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा