कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारोहात कॅनडाचे प्रतिनिधीत्व करणार्या भारतीय वंशाच्या केन परेरावर ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रथमच भारतीय वंशाच्या एखाद्या खेळाडूला कॅनडाने हा मान दिला आहे. भारतीय गोल्ड मेडल विजेता अभिनव बिंद्रा याच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी असून, कॅनडाच्या परेरामुळे आता दोन भारतीय उद्घाटन समोरोहात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आपल्या आई वडीलांच्या मातृभूमीत हा मान आपल्याला मिळाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे परेराने म्हटले आहे.