खेळ ग्राममध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे. चोरी रोखण्यात दिल्ली पोलीस अपयशी ठरत असून, आता खेळाडूंनीच त्यांच्या सामानाची काळजी घ्यावी असे फरमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काढले आहे.
खेळाडूंनी आपल्या खोल्यांना कुलपं घालावीत, तसेच त्यांच्या सामानाची जबाबदारी ही सरकारची नसल्याचेही शीलांनी म्हटले आहे. खेळग्राममध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वस्तू गायब होत आहेत. यात टॉयलेट सिट पासून न ते बेडसीटपर्यंत वस्तूंचा समावेश आहे.