तब्बल 80 वर्षांच्या कालावधीनंतर यजमानपद मिळाल्यानंतर आजपासून भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटनाला सज्ज झाला आहे.
राजधानी दिल्ली यासाठी एका नववधूप्रमाणे सजवण्यात आली असून, देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 54 देशांचे हजारो प्रतिनिधी यासाठी राजधानीत दाखल झाले आहेत.
आज ब्रिटनच्या राजपरीवारातील प्रिंस चार्ल्स यांच्याहस्ते गेम्सचे उद्घाटन करण्यात येणार असून, भारतीय राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील या खेळांच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा करणार आहेत.
कॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीविषयी काही दिवसांपासून वादंग माजला असतानाच अनेक देशांचे प्रतिनिधी देशात दाखल झाल्याने भारतीयांनामध्येही पाहुण्यांचे स्वागत करण्याचा उत्साह संचारला आहे.