5,500 पाहुण्यांसह क्वींस बॅटन दिल्लीत दाखल

वेबदुनिया

शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2010 (10:48 IST)
अवघ्या दोन दिवसांवर कॉमनवेल्थ गेम्स आले असतानाच, राजधानी दिल्लीत दाखल होणार्‍या पाहुण्यांची संख्याही वाढत आहे. दिल्लीत सध्या पाच हजारावर पाहुणे व मानाची क्वींस बॅटनही दाखल झाली आहे.

खेळ ग्राम मधील अव्यवस्थांवर आरोप होत असतानाच विदेशी पाहुण्यांनी मात्र याची स्तुती केली असून, सुरक्षा व्यवस्थांवरही आनंद व्यक्त केला आहे.

दिल्लीत दाखल झालेल्या अनेक पाहुण्यांमध्ये व्हीआयपींचाही समावेश असल्याने सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्‍याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा