बॉक्सिंगमध्ये भारताला तीन सुवर्णपदकं

वेबदुनिया

गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (08:35 IST)
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्सिंगमध्येही भारतीय त्रिकुटाने अशाच प्रकारचा विक्रम केला असून, भारताला यात तीन सुवर्ण पदकं मिळाल्याने भारताचे पदक तक्त्यातील पारडे जड झाले आहे.

काल संध्याकाळी झालेल्या सामन्यात भारताच्या सुरंजॉय, मनोज कुमार व परमजीत समोटा यांनी एकहाती विजय नोंदवत भारतीय चाहत्यांना खूश केले.

सुरंजॉयच्या सामन्यात केनियाच्या खेळाडूने वॉक ओव्हर केल्याने भारताला विजयी घोषीत करण्‍यात आले. मनोज कुमार व परमजीतने मात्र शानदार खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूंना साधा गुणही घेण्‍याची संधी मिळू दिली नाही.

वेबदुनिया वर वाचा