प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजवणे घातक

WD
जर आपण प्लास्टिकच्या बाटलीतून बाळाला दूध पाजवत असाल तर आत्ताच सावध व्हा. बाजारात मिळणार्‍या प्लास्टिकच्या बाटल्यांना बिसफिनॉल या रासयनिक द्रव्याचे कोटिंग असते. बाटलीत गरम दूध भरल्यावर हे रसायन दुधात मिसळून ते बाळाच्या शरीरातही जाऊ शकते व त्यामुळे त्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दुधाच्या बाटलीशिवाय कोल्ड ड्रिंक्स आणि पॅक्ड फूडलाही आर्द्रतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक कंपन्या प्लास्टिकला अशा घातक रसायनाचे कोटिंग करतात. या रसायनामुळे हृदय, मू‍त्रपिंड, यकृत आणि फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होउ शकतो. हल्द्वानी मेडिकल कॉलेजच्या फिजिओलॉजी विभागाच्या डॉ. जयंती पंत तसेच अ‍ॅनाटोमी विभागाचे डॉ. महेंद्र कुमार पंत यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. जयंती पंत यांनी याबाबत सांगितले की, बिसफिनॉल हे एक घातक द्रव्य आहे. त्याच्या कोटिंगमुळे खाद्यपदार्थांमध्ये आर्द्रता निर्माण होत नाही व ते दीर्घ काळ टिकून राहतात. मात्र या रसायनांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे रसायन निरोगी व्यक्तीचे रक्ताभिसरणही वेगवान करते. अमेरिका आणि चीनमधील 90 टक्के लोकांच्या मुत्रात बिसफिनॉल असल्याचे एका पाहणीत दिसून आले होते.

वेबदुनिया वर वाचा