मुलांना शिकवा आरोग्याचे नियम

बुधवार, 7 जुलै 2021 (08:19 IST)
घटकेत वादळ तर घटकेत ऊन, अश्या विचि‍त्र वातावरणामुळे विविध प्रकाराचे संसर्गजन्य आजार होत असतात. अशात प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याविषयी योग्य खबरदारी घेतली आणि मुलांना स्वच्छतेचे काही नियम पाळायला लावले तर आजारावर निश्चितच मात करता येते. मुलांना शिकवा काही नियम:
 
* जेवताना हात स्वच्छ असावेत
* पावसाळ्यात भेळ, उसाचा रस, सरबते, ज्यूस, उघड्यावरील पदार्थ यांचा आहारात वापर टाळावा
* मलमूत्र विसर्जनाला जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावे
* निरोगी असल्यास रूग्णालयात किंवा दवाखान्यात जाऊ नये
* निरोगी असले तरी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये कारण मुलांना अशा ठिकाणी लवकर संसर्ग होण्याची शक्यता असते
* सर्दी किंवा खोकला येत असला तर तोंडावर रुमाल धरावा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती