डाळिंबाचा रस आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे,फायदे जाणून घ्या

शनिवार, 3 जुलै 2021 (22:08 IST)
डाळिंब आरोग्यासाठी नेहमीच चांगले आहे. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता या समस्येमध्ये आराम मिळतो. यासह, हे रक्त वाढविण्यात देखील खूप मदत करते. डाळिंब हा रोगाचा नायनाट करण्यास  कारणीभूत फळ आहे असे म्हणतात.याच्या सेवनाने अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. फळे आणि रस वापरल्याने वेगवेगळे फायदे मिळतात.आज डाळिंबाचा रस घेण्याचे फायदे सांगत आहोत चला जाणून घेऊ या -
 
 
1 डाळिंबामध्ये फायबर, खनिजे, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम,पोटॅशियम,आयरन, फॉलेटस,आणि रायबोफ्लॅबिन सारखे आवश्यक घटक असतात.
 
 
2 डाळिंबात व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन ई,आणि व्हिटॅमिन ए प्रामुख्याने आढळतं.या सर्व व्हिटॅमिन च्या मदतीने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या आणि लाईन्स होत नाही.न्याहारीत किमान एक ग्लास डाळिंबाचा रस प्यावा.
 
3 अपचन, बद्धकोष्ठता, गॅसची समस्या उद्भवल्यास दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्या. आपल्याला लवकरच आराम मिळेल. एक आठवड्यासाठी हे करा.
 
4 डाळिंबाचा रस घेतल्याने रक्तवाहिन्या चांगल्या होतात.
 
5 आठवड्यात किमान 3 -4 दिवस डाळिंबाचा रस प्यायल्याने बेड कोलेस्ट्रॉल कमी होत.आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं.
 
6 हिमोग्लोबिन कमी झाल्यास डाळिंबाचा रसाचे सेवन करावे.या मुळे रक्त लवकर वाढतं.
 
7 डाळिंबाचा रस प्यायल्याने ताण कमी होतो. यासह,रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो
 
8 डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने तणाव होणारे हार्मोन कमी होतात.तसेच मेंदू देखील शांत राहते.
 
9 डाळिंबाच्या रसात पोषक घटक असतात या मुळे वजन वेगाने कमी होत.हे अतिरिक्त चरबी बर्न करण्यात मदत करतं.
 
10 डाळिंब फुफ्फुसांच्या कर्करोगाला वाढण्या पासून प्रतिबंध करतो.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती