स्टॉकहोमच्या केरोलिन्स्का इन्स्टिटय़ूटच्या एका अभ्यासानुसार, चिमुरडय़ांनी रोज न चुकता केवळ 5 मिनिटं व्यायाम केला तरी प्रकृती सुदृढ राहण्यास मदत होईल. सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बायोसायन्सिज आणि न्यूट्रीशनच्या वरिष्ठ संशोधक मेरी लोफ यांनी सांगितले की, शारीरिक क्रिया, स्नायूंची ताकद इत्यादींमुळे लहानग्यांनी व्यायाम करावा की नाही याबाबत थोडी शंका होती. मात्र, लहान मुलं व्यायाम करु शकतात. शिवाय ते हितकारक असल्याचं निष्पन्न झालं आहे. संशोधनादरम्यान असं निदर्शनास आलं आहे की, ज्या लहान मुलांनी रोज न चुकता व्यायाम केला त्यांच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा झाली, असेही लोफ यांनी सांगितले. अगदी फुग्यांसोबत खेळणं हा सुद्धा एकप्रकारचा व्यायाम आहे, असेही लोफ यांनी सांगितले.