कशा बदलाल सवयी?

बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (16:22 IST)
बर्‍याच लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. काहींची ही सवय बरेच दिवस कायम राहते. अशा वेळी धाक दाखवणे, शिक्षा करणे, एखादी चापटी मारणे, चारचौघात टीका करणे आदी उपाय केले जातात. पण त्यामुळे मुलांवरील ताण वाढतो. म्हणूनच अंगठा चोखण्याची सवय घालवण्यासाठी पालकांनी संयम ठेवावा. मुलांवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. 
 
मुलं स्तनपान करणारी असली तर हळूहळू ही सवय कमी करावी. मुलांची उपेक्षा करू नये अथवा त्यांच्या मनात भीती उत्पन्न होईल अशी कृती करू नये. 
 
मुलांना जवळ घेऊन समजुतीच्या स्वरात याचे तोटे सांगावेत. मुलांना विविध खेळात आणि अँक्टिव्हिटीजमध्ये गुंतवून ठेवावं. बराच वेळ अंगठा तोंडात गेला नाही तर शाबासकी द्यावी आणि एखादी भेटही द्यावी. मूल मोठं असेल तर त्याच्या समोर आरसा ठेवावा आणि अंगठा चोखताना तू कसा वाईट दिसतोस, हे दाखवावं.

वेबदुनिया वर वाचा