शिवराय आणि त्यांची अपत्ये

बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (11:18 IST)
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना एकूण 8 पत्नी होत्या सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई. या पैकी त्यांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई ह्यांच्या पासून सहा मुली आणि दोन मुले अशी एकूण 8 अपत्ये झाली. मात्र पुतळाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई ह्यांना अपत्ये नव्हती. 
 
शिवरायांची मुले आणि मुली -
* शिवरायांना सईबाईंपासून संभाजी महाराज पुत्ररत्नाची उत्पत्ती झाली. संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी पिलाजीराव शिर्के ह्यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई होत्या. 
* सोयराबाईंच्या पोटी राजाराम ह्यांच्या जन्म झाला. ह्यांच्या देखील तीन पत्नी होत्या. प्रतापराव गुजर ह्यांची कन्या जानकीबाई, हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या ताराराणी आणि कागलकर घाटगे ह्यांची कन्या अंबिकाबाई. 
* सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या सखुबाईंचे लग्न फलटणच्या महादजी निंबाळकर ह्यांच्याशी झाले. 
* सईबाईंच्या पोटीच राणूबाई ह्यांच्या जन्म झाला ह्यांचे पती सिंदखेडराजा येथील अचलोजी जाधवराव होते.
* अंबिकाबाई ह्या सईबाईंच्या कन्या होत्या ह्यांचे लग्न तारळे येथील हरजीराजे महाडिक ह्यांच्याशी झाले.
* सगुणाबाई ह्यांच्या कन्या राजकुवरबाई उर्फ नानीबाई ह्यांची लग्नगाठ दाभोळच्या गणोजी शिर्के ह्यांच्याशी बांधली.     
* सोयराबाई ह्यांच्या पोटी जन्मलेल्या दिपाबाई ज्यांना बाळीबाई देखील म्हणायचे ह्यांच्या विवाह विसाजी विश्वासराव ह्यांच्याशी झाला.
* कमळाबाई ह्यांचे लग्न नेताजी पालकर ह्यांचे सुपुत्र जानोजी पालकर ह्यांच्या समवेत झाले. कमळाबाई या सकवारबाई ह्यांच्या कन्यारत्न होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती