दही-पपई

साहित्य : १/२ कि. कच्ची पपई, १.१/२ पाव साईचे दही, ४ हिरव्या मिरच्या, हिग, जीरे, मोहरी, हळद, मीठ, साखर, तेल, कोथिबीर.

कृती : पपई धुवून घ्या. सालं काढून बारीक फोडी करा. या फोडी थोडी हळद घालून कूकरमध्ये वाफवून घ्या. वाफवलेल्या फोडी चाळणीत काढून घ्या. पाणी निघून जाईल.

थंड झाल्या की त्यात दही घाला. मीठ व चवीला साखर घाला. नंतर तेलात जीरे, मोहरी, हिग, मिरचीचे तुकडे, हळद घालून खमंग फोडणी करून ती दही-पपईत घाला. वरून कोथिबीर घाला. ही भाजी उन्हाळ्यात छान लागते. ताजे दही असल्यास बाळंतीणलाही चालते. नुसत्या पपईची भाजी फारशी कोणाला आवडत नाही. पण ही दह्यातली पपई खूप छान लागते.

वेबदुनिया वर वाचा