कैरी - चण्याच्या डाळीचे लोणचे

साहित्य : 
अर्धा कप काबुली चणा, दीड कप कैरी किसलेली, 1 लहान चमचा हळद, 1 चमचा मेथी, 1 चमचा शोप, 1/2 चमचा हिंग, 1 5 सुकी लाल मिरची, सव्वा कप सरसोचे तेल, मीठ चवीनुसार.

कृती :
सर्वप्रथम कैरीच्या किसात हळद आणि मीठ लावून अर्धा तासासाठी ठेवावे. नंतर एका स्वच्छ कपड्यात हा कीस घालून त्यातील पाणी काढून टाकावे. चणे आणि मेथीला रात्रभर कैरीतून निघालेल्या पाण्यात भिजत ठेवावे आणि किसाला फ्रीजमध्ये ठेवावे. मेथी, शोप, हिंग, मेथी पूड, सुकी लाल मिरची, तिखट, भिजलेले चणे आणि कैरी सकट सर्व साहित्य एकजीव करून ठेवावे. सरसोचे तेल गरम करून थोडे थंड करावे व लोणच्यात घालावे. तयार लोणच्याला एका बरणीत भरून 2-3 दिवस उन्हात ठेवावे. हे लोणचं वर्षभर खराब होत नाही.

वेबदुनिया वर वाचा