World Pharmacist Day 2021 : NIRF रँकिंगनुसार भारतातील शीर्ष फार्मसी महाविद्यालये
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (12:39 IST)
फार्मासिस्टची महत्वाची भूमिका ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन 2021 साजरा केला जाईल. या वर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन 2021 ची थीम "फार्मेसी: ऑलवेज ट्रस्टेड फॉर योर हेल्थ" आहे. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) ने जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यास सुरुवात केली. एफआयपी फार्मासिस्ट आणि फार्मास्युटिकल शास्त्रज्ञांच्या राष्ट्रीय संघटनांचे जागतिक महासंघ आहे.
सीबीएसई, ISC आणि राज्य बोर्डोंसह सर्व बोर्डोंचे 12 वीचे निकाल जारी केले गेले आहेत अशात फॉर्मेसीमध्ये करिअर करु इच्छित विद्यार्थी येथे टॉप फार्मेसी कॉलेजबद्दल जाणून घेऊ शकतात. नुकत्याच जाहीर झालेल्या NIRF रँकिंग 2021 नुसार अव्वल फार्मसी महाविद्यालयांची यादी आहे. एनआयआरएफ इंडिया रँकिंग 2015 मध्ये सुरू करण्यात आले आणि 2021 रँकिंग ही या प्रणालीची सहावी आवृत्ती आहे.
NIRF रँकिंग 2021 मध्ये जामिया हमदर्दला भारतातील फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान देण्यात आले आहे. पंजाब विद्यापीठ आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन एंड रिसर्च मोहाली
इंस्टीट्यूट ऑफ कैमिकल टेक्नोलॉजी, मुंबई
नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन एंड रिसर्च, हैदराबाद
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मेसी, ऊटी
मणिपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल साइंसेज, मणिपाल उडुपी
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मेसी, म्हसूर
नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन एंड रिसर्च, अहमदाबाद
उल्लेखनीय आहे की NIRF इंडिया रँकिंग 2021 च्या पैरामीटरमध्ये टीचिंग, लर्निंग एंड रिसोर्सेज, रिसर्च एंड प्रोफेशनल प्रॅक्टिस, ग्रेजुएशन परिणाम, आउटरीच आणि इंक्लूसिविटी एंड परसेप्शन यांचा समावेश आहे.