CET संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय; 12 वीचे गुणही ठरणार महत्वाचे

मंगळवार, 31 मे 2022 (22:37 IST)
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
महाराष्ट्र सामायिक प्रवेश  2022 परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय उच्च राज्य सरकारने घेतला आहे. सीईटीमध्ये मिळालेले गुणांमध्ये याचा 50-50 टक्के फॉर्म्युलाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी आज दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा अभ्यास करावा लागणार आहे.
 
सीईटी प्रवेश प्रक्रियेचा दरवर्षी होणारा गोंधळ आता पुढील वर्षापासून होणार नाही. कारण, पुढील वर्षापासून 12 वीला मिळालेले गुण तसेच सीईटीमध्ये मिळालेले गुण असे 50-50 टक्क्यांचा फॉर्म्युलाची अंबलबजावणी केली जाणार आहे. सीईटीद्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा निर्णय लागू होणार आहे. यामुळे आधी बारावीचे विद्यार्थी फक्त सीईटीचा अभ्यास करत होते. मात्र, आता दैनंदिन अभ्यासक्रमाचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. दरम्यान, हा प्रयोग 2012 मध्ये राबवण्यात आला होता. मात्र, नंतर तो बंद करण्यात आला.
 
तसेच, पुढच्या वर्षीपासून सीईटीचा निकाल 1 जुलै रोजी लागणार असून 1 सप्टेंबरपासून सत्र सुरू होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण कमी वाटत असतील. त्यांना केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती