Career in Fitness फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर बनवा

गुरूवार, 21 जुलै 2022 (08:07 IST)
आज जिम, मोठे हॉटेल्स, हेल्थ क्लब,फिटनेस सेंटर,स्पा,टूरिस्ट रिसॉर्ट्स इत्यादी ठिकाणी फिटनेस प्रशिक्षकांची मागणी आहे. काही अनुभवासह आपण आपले स्वतःचे फिटनेस सेंटर देखील सुरू करू शकता.बड्या बहुराष्ट्रीय कंपन्याही वेळोवेळी आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्कप्लेस वेलनेस आणि फिटनेस प्रोग्रॅम आयोजित करतात,जिथे फिटनेस ट्रेनर किंवा प्रशिक्षकांची मागणी प्रचंड आहे. 
 
आज जिम,मोठी हॉटेल्स, हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर,स्पा,टूरिस्ट रिसॉर्ट्स अशा अनेक ठिकाणी फिटनेस प्रशिक्षकांची मागणी आहे.
 
फिटनेस उद्योग आज शिगेला आहे.आज भारतात  फिटनेस उद्योगाचा  2000 करोड रुपये पेक्षा जास्तीचा वाटा आहे.हाय टेक जिम आणि हेल्थ क्लब ने याला तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय केले आहे.कोर्स केल्यावर आपण यापैकी कोणत्याही करिअरची निवड करू शकता.
 
* ऍथलिट ट्रेनर-
* आहारतज्ञ
* क्रीडा प्रशिक्षक
* शारीरिक थेरपिस्ट
  
कार्याचे स्वरूप  -
फिटनेस ट्रेनर म्हणून शारीरिक आरोग्यासह एरोबिक्स लवचिकता,ट्रेनिग,बी एम आई,आणि ट्रेनिगशी संबंधित सर्व उपकरणांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.जेणे करून लोकांना शिकवण आणि माहिती देणे सहज होते.आपल्याकडे ही सर्व माहिती असल्यास आपण त्यांची शारीरिक रचना आणि वजन लक्षात घेऊन  त्यांच्यासाठी एक चांगला आहार निश्चित करू शकता.त्यांना फिट राहण्यासाठी उपकरणांच्या वापरा बद्दलचे योग्य ज्ञान देऊ शकता.
 
फिटनेस ट्रेनरला मुळात फिटनेस न्यूट्रीशियन,वेट मॅनेजमेंट,स्ट्रेस रिड्युसन,हेल्थ रिस्क मॅनेजमेंट इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.  
 
एरोबिक्स प्रशिक्षक म्हणून, आपण व्यायाम सत्रात एरोबिक्स, स्ट्रेचिंग आणि स्नायू व्यायामावर लक्ष केंद्रित करता.
 
क्रीडा जगात ऍथलिटचा स्टॅमिना वाढविण्यासाठी आपण जॉगिंग,वेट लिफ्टिंग, पुशअप सारखे व्यायामांवर भर देता.
 
आपण निसर्गोपंचार तज्ज्ञ असल्यास व्यायामामुळे रोगमुक्त राहण्याच्या युक्ती देखील शिकवता. 
 
फिटनेस ट्रेनर किंवा प्रशिक्षक म्हणून आपल्याला विविध प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येण्यासाठी बोलण्याची चांगली कला आणि व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
 
कोर्स केल्यानंतर मासिक उत्पन्न कमी प्रमाणात असत.परंतु अनुभवासह आपण हाईट अँड फिटनेस सेंटर,स्पा,आणि रिसॉर्ट मध्ये सामील होऊन चांगले पैसे कमावू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती