Career In Mechanical Engineering: मेकॅनिकल इंजिनीअरिंगनंतर या क्षेत्रात नोकरीच्या संधी, पात्रता, जाणून घ्या

सोमवार, 18 जुलै 2022 (13:37 IST)
Mechanical Engineering:अभियंता हा कोणत्याही उत्पादनाचा कणा मानला जातो. अभियांत्रिकीचे अनेक विभाग देखील आहेत, उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनीअरिंग, मॅकेनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग  इ. या सर्व विभागांची कार्ये भिन्न आहेत आणि त्यांच्या उत्पादनामध्ये भिन्न भूमिका आहेत. मॅकेनिकल इंजिनीअरिंग  हे सर्वात विस्तृत अभियांत्रिकी क्षेत्रांपैकी एक आहे. हे कोणत्याही गोष्टीची रचना, विकास, स्थापना, ऑपरेशन आणि देखभाल यांच्याशी संबंधित आहे. मॅकेनिकल इंजिनीअरिंग प्रत्येक साधन आणि मशीनची रचना, विकास आणि कार्यक्षमता वाढवतात. मेकॅनिकल इंजिनीअरिंग हे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय करिअर होत आहे. या क्षेत्रात करिअर कसे करता येईल जाणून घेऊ या.
 
मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्येही अनेक क्षेत्रे आहेत ज्यात तरुण आपले करिअर करू शकतात.
1- एरोस्पेस इंजिनीअरिंग 
2- ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग 
3- कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग सर्व्हिस 
4- एनर्जी युटिलिटी 
5- सरकारी संस्था
6-इंडियन आर्म्ड फोर्स अँड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स 
7- मेन्यूफेक्चरिंग इंड्रस्टी 
 रेल्वे इंजिनीअरिंग 
9- बायोमेडिकल इंडस्ट्री
10- क्रीडा
 
पात्रता-
एक पात्र अभियंता होण्यासाठी तरुणांना 12वी नंतर जेईई इत्यादी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा पास करून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो आणि बीई किंवा बीटेक पदवी घ्यावी लागते. तरुणांना हवे असल्यास ते एका चांगल्या पर्यायासाठी एमटेक देखील करू शकतात.
 
कुठून करावे-
1 -IIT रुडकी
2- SRM विद्यापीठ
3- बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
4- IIT कानपूर
5- Amity University
6-आयआयटी खरगपूर
7- VIT वेल्लोर
8- IIT गुवाहाटी
9- LPU
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती