एम.फिल. इन सायकॅट्रीक सोशल वर्क अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

गुरूवार, 28 जुलै 2022 (21:11 IST)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सन 2022-2023 करीता विद्यापीठाचा एम.फिल इन सायकॅट्रीक सोशल वर्क अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दि. 05 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेल्या एम.फिल इन सायकॅट्रीक सोशल वर्क अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वसन परिषद यांची व अभ्यासक्रमासंदर्भात राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनांन्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाचे संलग्नित पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज येथील ससून हॉस्पिटल कॅम्पस येथे महाराष्ट्र मेंटल हेल्थ मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता एम.फिल सायकॅट्रीक सोशल वर्क अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. 
 
एम.फिल इन सायकॅट्रीक सोशल वर्क अभ्यासक्रमास प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांची सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी व अभ्यागतांसाठी www.muhs.ac.in या संकेतस्थळावर एम.फिल इन सायकॅट्रीक सोशल वर्क अभ्यासक्रमासंदर्भात माहिती उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासंदर्भात शैक्षणिक पात्रता, नांेदणी शुल्क, प्रवेश क्षमता, आरक्षण, परीक्षेचे स्वरुप, नियमावली, प्रवेश अर्ज इत्यादी माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर अधिसुचना क्र. 30/2022  मध्ये देण्यात आली आहे. एम.फिल इन सायकॅट्रीक सोशल वर्क याबाबत अधिक माहितीसाठी पालक, विद्यार्थी व अभ्यागतांनी 253-2539196 किंवा 0253-2539206 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे गुणवत्तापुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती