महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरती प्रक्रियेस होणार विलंब , गुणवत्ता राखण्यासाठी आयोगाने परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता क्लास 1 आणि क्लास 2 पदासाठी एकच पूर्वपरीक्षा होणार आहे. ग्रुप B आणि ग्रुप C साठी एकच पूर्वपरीक्षा होणार आहे. पुढच्या वर्षीपासूनच्या परीक्षांसाठी हा निर्णय लागू होणार आहे
4. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारीत संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरीता उमेदवाराने दिलेला विकल्प हा संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल व त्याच्या तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरीचा पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.