Career in Interior Designer इंटिरियर डिझायनर म्हणून करिअर करण्यासाठी टिप्स जाणून घ्या
रविवार, 4 डिसेंबर 2022 (08:12 IST)
आजच्या युगात प्रत्येकाला खाजगी सरकारी नोकरी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगारात नोकरी करायची असते. पण आजच्या काळात नौकरी सहजरित्या मिळणे अवघड आहे. कोणाला सरकारी नौकरी मिळवायची असते, तर कोणाला डॉक्टर म्हणून व्हायचे असते. कोणाला शिक्षक तर कोणाला इंजिनियर व्हायचे असते.
आजच्या युगात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे करिअरच्या अनेक संधी आहेत. आपण इंटिरिअर डिझाईनिंग च्या क्षेत्रात देखील आपले करिअर करू शकता. हे केल्याने आपल्याला एखाद्या कंपनीत चांगल्या पगाराची नौकरी मिळू शकते. आपल्याला कंपनीत नौकरी करायची नसल्यास आपण स्वतःचे ऑफिस देखील उघडून चांगली कमाई करू शकता.
इंटिरियर डिझायनिंग म्हणजे काय?
इंटिरियर डिझाइन हा एक बहुआयामी व्यवसाय आहे. इंटिरिअर डिझायनर घर, ऑफिस, दुकानाच्या सजावटीपासून इतर प्रकारच्या इमारतींपर्यंत सजावट करतो. याला इंटिरियर डिझायनिंग म्हणतात. इंटिरिअर डिझायनिंगचे काम खूप सर्जनशीलतेशी निगडित आहे, त्यामुळे हे करिअर स्वीकारण्यापूर्वी सर्जनशीलता असणे अत्यंत आवश्यक आहे.
आजकाल लोकांचा घर आणि ऑफिस सजवण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. त्यामुळेच इंटिरियर डिझायनर्सची मागणी प्रचंड वाढली आहे.घर, दुकान, ऑफिस किंवा शोरूम डिझाइन करणे असो, इंटिरिअर डिझायनरचे काम त्याला सर्वोत्तम लूक देणे असते.
इंटिरियर डिझायनिंग हे अतिशय वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात तुमचे करिअर घडवायचे असेल तर तुमच्यासाठी सर्जनशील असणे खूप गरजेचे आहे. इंटिरिअर डिझायनिंगमधील कोणत्याही एका क्षेत्रात स्पेशलायझेशनही करता येते, याअंतर्गत तुम्ही किचन डिझायनिंग, रूम डिझायनिंग, ऑफिस डिझायनिंग, बिझनेस डिझायनिंग आणि बाथरूम डिझायनिंगमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. आजकाल या क्षेत्रात खूप विस्तार होत असल्यामुळे तरुणांना नवनवीन संधी निर्माण होत आहे. इंटिरिअर डेकोरेटरचे उत्पन्न हे त्यांनी केलेल्या कामावर अवलंबून असते. तुम्ही कोणत्याही कंपनीत नोकरी करायची म्हटलं तर तुमची सुरुवात 15-25 हजार रुपये होऊ शकते. हा पगार तुमच्या अनुभव आणि कार्यशैलीनुसार वाढू शकतो, जो 40-50 हजार रुपये देखील असू शकतो.
इंटिरियर डिझायनरचे गुण -
कार्यक्षेत्र कोणतेही असो, माणसामध्ये त्यासंबंधी आवश्यक गुण असणे अत्यंत आवश्यक आहे.जेणे करून ग्राहकाला त्यांच्या गरजेनुसार काम करून त्यात कौशल्य मिळवू शकता.
म्हणूनच इंटिरिअर डिझायनरला कलात्मक असणं खूप महत्त्वाचं असतं.
* कोणत्याही इंटीरियर डिझायनरमध्ये सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाची समज असणे खूप महत्वाचे आहे.
* बाजारातील ट्रेंड्स सोबत नेहमी अपडेट असायला हवे कारण आजकाल लोक एकमेकांकडे बघूनच काम करतात. म्हणूनच, जोपर्यंत तुम्हाला बाजारात चालणारा ट्रेंड समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
* ग्राहकांशी तुमचे व्यवहार मैत्रीपूर्ण असावेत. यामुळे तुम्ही आणि ग्राहक यांच्यात परस्पर समज आणि विश्वास निर्माण होतो.
* त्यात ग्राहकांच्या मागणीनुसार काम करण्याची क्षमता असावी.
* रचना करताना कलात्मकता आणि तार्किक बुद्धिमत्ता असणे देखील खूप महत्वाचे आहे.
* इंटिरिअर डिझायनरने ग्राहकाच्या बजेटनुसार उत्तम दर्जाची सुविधा देणे अत्यंत आवश्यक आहे.
पात्रता-
इंटिरिअर डिझायनिंग कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असावी आणि मिळालेल्या गुणांची टक्केवारी किमान 55% असावी. जर तुम्ही कलाक्षेत्रातून 12वी उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी तो प्लस पॉइंट असेल. याशिवाय तुमच्या कलेची आवड आणि चित्रकलेचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान आणि सर्जनशील क्षमता असणेही खूप महत्त्वाचे आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकता. जर तुम्हाला इंटेरिअर डिझायनिंग पदवी अभ्यासक्रम करायचा असेल, तर पदवीनंतरही तुम्ही पीजी डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम करू शकता.
इंटिरियर डिझायनिंग कोर्सेस कुठून करावे-
भारतातील काही संस्था इंटीरियर डिझायनिंगमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स देखील देतात. सहा महिने ते पाच वर्षे कालावधीचे हे अभ्यासक्रम विविध अशासकीय आणि सरकारी संस्थांमधून करता येतात.
डिझाईनच्या क्षेत्रात इंटिरिअर डिझायनिंग स्कूल ऑफ इंटिरियर अहमदाबाद येथे पाच वर्षांचा कोर्स देखील उपलब्ध आहे.