हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करीयर

NDND
उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीने त्याचा पसारा वाढतच चालला आहे. त्यामुळे दळणवळणही वाढल्याने व्यवसायाच्या निमि‍त्ताने लोकांना प्रवासही वाढला आहे. लोकांच्या हाती पैसा खेळू लागल्याने पर्यटनही वाढले आहे. या सगळ्यांमुळे हॉटेल व्यवसायाला देखील चांगले दिवस आले आहे. शहरांचा औद्येगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे त्रितारांकीत व पंचतारांकीत टोलेजंग हॉटेल्स उभी रहात आहेत. हॉटेल व्यवसायाला इंडस्ट्रीचे स्वरूप प्राप्‍त झाले आहे. हॉटेल मॅनेजमेंट हा प्रमुख व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे. हॉटेल व्यवसायातही अनेक प्रकारच्या करीयरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सर्वच हॉटेलमध्ये मॅनेजर व असिस्टंट मॅनेजरला ग्राहकांच्या सुविधांवर लक्ष ठेवावे लागते. हॉटेलच्या दर्जानुसार त्यात काही विभाग पाडलेले असतात. विविध विभागामध्ये कर्मचार्‍यांची संख्या कमी जास्त होऊ शकते. प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांना त्या त्या विभागातील कामे अगदी चोख ठेवावी लागतात. त्यात अन्नाचा दर्जा, हाऊस किपिंग, सजावट अशा विविध जबाबदार्‍यांचा समावेश असतो. हॉटेलमध्ये निवासी व्यवस्थापक नामक एक पद असते. त्याला 24 तास हॉटेलातच थांबावे लागते. संपूर्ण हॉटेलचे व्यवस्थापन त्याला बघावे लागते.

केटरिंग हा हॉटेलमधील एक महत्त्वाचा विभाग आहे. हॉटेलला लागणार्‍या अन्नधान्याचा साठा करणे, ग्राहकाने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे अन्न पदार्थ तयार करणे, तसेच त्यासाठी लागणार्‍या सामुग्रीची तयार या विभाग प्रमुखाला करावी लागते.
या दोन विभागांच्या व्यतिरिक्त हॉटेलमध्ये अकाऊंटस, मार्केटींग, इंडिनिअरिंग, पर्सनल अशा विभाग कार्यरत असतात व तेथे व्यवस्थापन शाखेतील शिक्षण पूर्ण केलेल्याना संधी असते.

NDND
हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम शिकवणार्‍या संस्था
1. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, व्ही.एल. मार्ग, विले पार्ले (प) मुंबई-400 056.
2. भारतीय विद्या भवन, एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च, मुन्शी नगर, दादाभाई मार्ग, अंधेरी (प) मुंबई 400 058
3. सिंबॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पाचवा मजला, आतूर सेंटर, गोखले क्रॉस मार्ग, मॉर्डे कॉलनी, पुणे- 411 016.
4. शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर कोल्हापूर 416 004.
5. फ्रुडक्राफ्ट इन्स्टिट्यूट, इंजिनिअरिंग कॉलेज, हॉटेल कॅम्पस शिवाजी नगर पुणे. 411 005.
6. एग्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, आग्रा- मुंबई हायवे नाशिक- 422 009.
7. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ मॅनेजमेंट आयआयटी पवई मुंबई 400 076.

महाराष्ट्रातील काही इन्स्टिट्यूटमध्ये हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम शिकविला जातो. दहावीनंतर तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स तर बारावीनंतर तीन व चार वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे.

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटच्या (डीएचएम) संस्था-
1. डॉ. डी.वाय. पाटील एज्युकेशन अकॅडमी, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॉटरिंग टेक्नॉलॉजी, विद्यानगर, सेक्टर 7, नेरूल, नवी मुंबई. 400 706
2. डॉ. डी.वाय. पाटील प्रति. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॉटरिंग टेक्नॉलॉजी ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे
3. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, वीर सावरकर मार्ग दादर, मुंबई
4 इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल व टुरिझम, कावेशर, भारत कोल्ड स्टोअरजवळ, घोडबंदर रोड, ठाणे.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (बीएचएम)चे इन्स्टिट्यूट-
1. भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे-सातारा रोड़ धनकवडी पुणे.
2. महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी 12 सी भांबुर्डा के. एम मुन्शी रोड शिवाजी नगर पुणे 3. डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॉटरिंग टेक्नॉलॉजी, पिंपरी पुणे.