नर्सिंग क्षेत्रात करिअर

गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (12:59 IST)
परिचारक बनण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातली व्यक्ती सुरुवात करू शकते. तुम्ही शालान्त परीक्षेनंतर ए.एन.एम. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणं उचित ठरेल किंवा जी.एन.एम. वा बी.एस.सी. कोर्साला प्रेवश  घेणं उचित ठरतं. सहाय्यक नर्स किंवा हेल्थ वर्कर हा अभ्यासक्रम कोणत्याही क्षेत्रातली व्यक्ती पूर्ण करून करिअर करायला सुरुवात करू शकते. 
कालावधी - दीड वर्ष 
पात्रता - किमान पहावी पास 
जनरल कोर्स मिडवाइफरी (जी.एन.एम.)
कालावधी - साडे तीन वर्ष 
पात्रता - भौतिक, रासाय‍निक किंवा जीवविज्ञान या विषयांसोबत बारावीत किमान 40 टक्के गुण मिळवणं आवश्यक. या दोन अभ्यासक्रमांच्या व्यक्तिरिक्त विविध स्कूल आणि कॉलेजमध्ये नर्सिगचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी इंग्लिश,  भौतिक आणि रसायनशास्त्र या विषयांत बारावीत किमान 45 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. तसंच या अभ्यासक्रमांसाठी प्रेवश मिळवण्यासाठी 17 वर्ष वय असणे आवश्यक आहे. बी.एससी. नर्सिंग. 
 
हा अभ्यासक्रम डिप्लोमा आणि डिग्री अशा दोन्ही पदव्यांनंतर करू शकतो. दोन वर्षाच्या नियमित अभ्यासक्रमासाठी बारावी आणि जनरल नर्स मिडवाइफरी हा अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक असतं. तर दूरस्थ अभ्यासक्रमासाठी बारावीसोबत जनरल नर्स मिडवाइफरी आणि दोन वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे. भारतीय रक्षा सेवा द्वारा संचलित बी.एससी. (नर्सिंग) 
 
या अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा 16 ते 24 इतकी असून किमान पात्रता  भौतिक, रसायन, जीवशास्त्र तसंच इंग्लिश हे विषय बारावीसाठी घेऊन  त्यात किमान 45 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

वेबदुनिया वर वाचा