इंडियन फँशन अकादमीतर्फे पुर्णवेळ व अर्धवेळ अभ्यासक्रमाची सुरूवात....

मंगळवार, 5 एप्रिल 2016 (11:23 IST)
१० व १२ पास, नापास विद्यार्थ्यासह, गृहीणी व आवड जोपासणा-यां सर्वांना प्रवेश मिळणार 
कलेला कधीही मरण नसते अस म्हटलं जाते अन ते पूर्णतहा खरंही आहे. आज या क्षेत्रातील उलाढाल व व्याप्ती पाहता या क्षेत्रात करीयर करू इच्छिणा-यांना गगनभरारी घेता येऊ शकेल. फँशन डिझाईनिंग हे त्यापैकीच एक क्षेत्र. चित्रपट क्षेत्रापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारलेल्या या क्षेत्रात करीयर करणा-यांसाठी इंडियन फँशन अकादमीतर्फे पुर्णवेळ व अर्धवेळ स्वरूपातील अभ्यासक्रमाची सुरूवात येत्या ९ एप्रिलपासून करत आहे.
 
फँशन डिझाइंनिग अभ्यासक्रमात ‘डिप्लोमा इन फँशन डिझाइंनिग’ हा एक वर्षाचा कोर्स आहे  तर ‘अँडव्हान्स डिप्लोमा इन फँशन अँण्ड टेक्स्टटाईल्स डिझाइंनिग’ हा दोन वर्षाचा कोर्स आहे. तसेच अर्धवेळ डिप्लोमासाठी दर रविवारी विशेष बँच भरविली जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी १०वी व १२ वी बारावी पास अथवा नापास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकेल. तसेच या क्षेत्रात करीयर करण्याची इच्छा असणा-या गृहीणी वा नोकरी करणा-यांसाठीही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठीही विद्यार्थ्याना संस्थेव्दारे मार्गदर्शन केले जाते.
 
इंडियन फँशन अकादमी ही संस्था सिटी ऍड गिल्ड्स (युके), एनएसडीसी आणि महाराष्ट्र सरकारच्या व्यवसायिक शिक्षण राज्यमंडळासोबत सलग्नित असून फिक्की या नावाजलेल्या संस्थेची महाराष्ट्रातील एकमेव सदस्य आहे. श्री.नितीन मगर, संचालक, आयएफए यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन तसेच व्यावसायिक आयुष्यात स्वताला कसे घडवता येऊ शकेल याविषयी वेळोवेळी सल्ले व दिशा दिली जाते. आमच्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थाला आम्ही पुस्तकी  ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकांव्दारे मार्गदर्शनाव्दारे घडविण्यावर आमचा कल जास्त आहे. नुकताच इमाम सिध्दीकी, शगून गुप्ता, ममता जोशी व संजय गुप्ता हे आय़एफए सोबत जोडले गेले आहेत व या लाभ मुलांना विशेष मार्गदर्शनाव्दारे मिळणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी कृपया संपर्क करा –
इंडियन फँशन अकादमी – मुंबई व ठाणे
संपर्क -  +91 9819909135 / +91 8452045199
इमेल -  [email protected]
 
इंडियन फॅशन अकॅडमी :
 
फॅशन डिझाइनिंग क्षेत्रातील डिझाइन आणि मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणारी दर्जेदार संस्था आहे. इंडियन फॅशन अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग व शाखा दादर, ठाणे, पुणे (चिंचवड), अहमदनगर, औरंगाबाद येथे विस्तारलेल्या असून ही संस्था फॅशन जगतात गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असून आहे. इंडियन फॅशन अकॅडमी ही महाराष्ट्रातल्या फिक्की सारख्या नावाजलेल्या संस्थेची सदस्य आहे व सिटी ऍड गिल्ड्स (युके), एनएसडीसी आणि महाराष्ट्र सरकारच्या व्यवसायिक शिक्षण राज्यमंडळासोबत सलग्नित आहेत व फॅशन जगतातील विख्यात फॅशन डिझाइनर्सचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. 

वेबदुनिया वर वाचा