अरोमा थेरपी एक आकर्षक करिअर

रविवार, 9 एप्रिल 2023 (15:09 IST)
अरोमा थेरपी जवळपास 100 वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. पण सध्या हे एक आकर्षक करिअर म्हणून समोर येत आहे. यामध्ये नैसर्गिक उपाय केले जात असल्याने कृत्रिम औषधांसाठी हा एक सक्षम पर्याय ठरत आहे. 
 
अरोमा थेरपीमध्ये रोपट्यांपासून काढण्यात आलेले विशिष्ट प्रकारचे तेल रुग्णांसाठी वापरले जाते. तुमचा कल या पारंपरिक वैद्य‍कीय सेवा देण्याकडे असेल तर या काही टीप्स... 
 
योग्य शिक्षण घ्या 
अरोब थेरपी शिकविणार्‍या अनेक संस्था ब्रिटनमध्ये आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ होलिस्टीक अरोमा थेरपी ही त्यापैकीच एक. रोपांचे घटक, शरीरशास्त्र, व्यावसाय अभ्यास, उपचारात्मक नातेसंबंध, संशोधन, केस स्टडी या विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. रुग्णांमधील समस्या, रोपांचे ज्ञान व जुन्या माहितीचे संकलन हे कौशल्य तुम्हाला विकसित करावे लाग‍तील. 
 
अरोमा थेरपिस्टचे प्रकार 
* अरोमा थेरपी करणारा प्रॅक्टीशनर
* मसाज थेरपिस्ट 
* कायरोप्रॅक्टर 
* निसर्गोपचार तज्ज्ञ 
 
कुठे काम कराल 
अरोमा थेरपिस्ट हे सहसा पर्यायी वैद्यकीय उपचार करणार्‍या क्लिनिकमध्ये काम करतात. रेकी आणि अॅक्युपंक्चर सारखे उपचार होणार्‍या क्लिनिकमध्ये यांचे काम असते. तुम्ही घरुन अथवा रुग्णांच्या घरी जाऊनदेखील प्रॅक्टीस करू शकता. मात्र या क्षेत्रात चांगल्या मिळकतीसाठी पर्यायी वैद्यकीय उपचार केंद्रामध्ये काम करणे सर्वोत्तम. 
 
बहुतांश अरोमा थेरपी अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात कामाचा अनुभव दिला जातो. 
 
त्या आधारे तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात उतरू शकता. 
 
या क्षैत्रात पुढे कसे जाल 
या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी संबंधित विषयाच्या अन्य पदव्या घेणे योग्य ठरेल. अतिरिक्त शिक्षणाचा उपयोग तुमचे विज्ञानसह अन्य विषयातील कौशल्य वाढविण्यासाठी करता येईल. या टीप्सचा उपयोग करा आणि अरोमा थेरपीमधील करिअरद्वार अन्य लोकांचे जीवन देखील निरोगी बनवा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती