इंप्रेसिव्ह असावं कव्हर लेटर

कोणत्याही कंपनीत एका पदासाठी प्रचंड संख्येत अर्ज येतात. या गर्दीत आपला अर्ज उठून दिसायला हवा कारण ते म्हणतात न की फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन. कव्हर लेटरही फर्स्ट इंप्रेशन असतं त्यामुळे ते योग्य असणं गरजेच आहे. म्हणूनच इंप्रेसिव्ह कव्हर लेटर लिहिण्यासाठी पाहू काही टिप्स:


 
* प्रत्येक अर्जासोबत एकाचं प्रकारचं कव्हर लेटर जोडता येणार नाही कारण संस्था आणि पदाप्रमाणे कव्हर लेटर असायला हवं. या पदासाठी आपणं योग्य आहोत, हे कव्हर लेटरमध्ये दिसून यावं. आपले मत नेमक्या आणि समपर्क शब्दात मांडणं गरजेचं असतं. अनुभव आणि आपली क्षमता यात मांडायला हवी.
 
आपण विकसित केलेले कौशल्य, क्षमता यासह याने नव्या कंपनीला कसा लाभ होईल हे लिहा.

* क्वॉलिटीला अधिक महत्त्व द्या क्वाँटिटीला नाही. स्वत:चा कौतुक करण्याच्या नादात नको ते उल्लेख नसले पाहिजे.
 
खूप जास्त आयडियोलॉजी न मांडता वास्तववादी मुद्दे मांडा. अतिउत्साहाच्या भरात अतिशयोक्ती टाळा.


 
कव्हर लेटरच्या खाली साजेल असं टेस्टिमोनियल लिहा.
 

वेबदुनिया वर वाचा