बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे

सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 (15:28 IST)
1 इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणातही बदल नाही
2 स्टार्ट अप इंडियासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार
3 तंबाखूजन्य पदार्थ महाग, तंबाखू, बीडी, सिगरेट महागणार
4 10 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्या महागणार
5 रिजर्व बँकेच्या पतधोरणांची बँकांकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी पतधोरणांना वैधानिक दर्जा, लवकरच आरबीआय कायद्यात दुरूस्ती
6 घर भाडे करसवलतीची मर्यादा 24 हजारावरून 60 हजारपर्यंत वाढवली
7 लाखांपर्यंत कमाई असलेल्या नोकरदारांना आयकरामध्ये 3 हजारांपर्यंतची अतिरिक्त सूट
8 येत्या 3 वर्षात सर्व पोस्ट कार्यालयात एटीएम बसवणार
9 खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
10 बुडित कर्जामुळे गोत्यात आलेल्या बँकांसाठी 25 हजार कोटी रुपये
11 निर्गुंतवणूक खात्याचं नाव आता ‘दीपम’असं ठेवण्यात येणार आहे.आधी कृषी खात्याचंही बदलण्यात आलेलं!
12 रस्ते आणि रेल्वेच्या विकासासाठी 2 लाख 18 हजार कोटी खर्च करणार
13 चीटफंड कंपन्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी नवा कायदा आणणार
14 वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुण उद्योजकांना संधी देणार
15 सार्वजनिक वाहतुकीमध्ये जुने परमीट मोडीत काढणार
16 रस्ते आणि महामार्गांसाठी 55 हजार कोटी
17 जिल्ह्यात डायलिसिस केंद्र  उभारणार
18 स्टँड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
19 स्किल डेव्हलपमेंट स्कीमसाठी 1700 कोटींची तरतूद.
20 सर्व शिक्षा अभियानअंतर्गत आणखी 62 नवोदय विद्यालयं उघडणार
21 उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कागदपत्रं उपलब्ध होणार

वेबदुनिया वर वाचा