काय महाग काय स्वस्त?

सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 (13:53 IST)
आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी २०१६ - १७ चा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यात जाणून घेऊ काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे. 
 
महाग : लक्झरी कार्स तसेच ब्रँडेड कपडे व तंबाखूजन्य पदार्थ महागणार आहेत. तंबाखूजन्य पदार्थांवरील अबकारी करात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आल्याने विडीवगळता इतर तंबाखूजन्य पदार्थ महागले आहेत. तसेच सोन्यावरील आयाशुल्कारत वाढ करण्यात आल्याने सोन्याचे दागिने तसेच हि-याचे दागिनेही महागतील. तसेच डिझेल गाडयांवर अडीच टक्के तर पेट्रोल गाडयांवर एक टक्का सेस लावण्यात आला असून १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्याही महागणार आहेत.
काय काय झाले महाग
- ब्रँडेड कपडे
- लक्झरी कार
- विडी वगळता इतर तंबाखू जन्य पदार्थ तसेच सिगारेट
- सोन व हि-याचे दागिने
- चपला व बूटही महागले 
 
स्वस्त : सरकारने आम जनतेला जास्त राहत दिली नाही आहे. विकलांग लोकांचे सहायक उपकरण, नॅशनल डायलासिस सेंटर्स स्थापन करणार, पहिलंच घर घेणा-यांसाठी 37 लाख रुपयांपर्यत गृहकर्ज व घराची किंमत 50 लाखांपर्यंत असल्यास 50 हजार रुपयांची कर सवलत. 

वेबदुनिया वर वाचा