बजेटमधून दिल्ली सरकारला हवाय निधी

वेबदुनिया

सोमवार, 22 फेब्रुवारी 2010 (12:51 IST)
WD
WD
राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी दिल्ली सरकारने आणखी निधी मागितला असून, आगामी बजेटमध्ये सरकारने यासाठी दोन हजार कोटीची गुंतवणूक करावी अशी मागणी दिल्ली सरकारने केली आहे.

राजधानीचे अर्थमंत्री ए के वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रकुल खेळांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धांची तयारी सुरू असून, यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होत असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यासाठी मागणी केल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारने आपल्याकडील 11 हजार कोटी राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीसाठी खर्च करण्यासाठी दिले असून, अजूनही अनेक कामं शिल्लक असल्याने केंद्र सरकारने बजेटमध्ये या संदर्भात तरतूद करावी अशी मागणी वालिया यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा