अल्पसंख्यांकांच्या योजनांसाठी १७४० कोटी

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशातील अल्पसंख्याकांसाठी यात खास तरतूद करण्यात आली असून, त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी १७४० कोटी रुपयांची तरतूद सरकारने यात केली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यात ७४ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे प्रणव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. मागील आर्थिक वर्षात सरकारने या योजनांसाठी एक हजार कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.

वेबदुनिया वर वाचा