राजीव गांधी पेयजल योजनेसाठी 7300 कोटी

वार्ता

शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (16:46 IST)
अर्थमंत्री पी.चिदंबमरम यांनी आज वर्ष 2008-09 साठी सादर केलेल्या बजेटमध्ये राजीव गांधी पेयजल योजनेसाठी मागील वर्षा इतकाच म्हणजे सात हजार तीनशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेसाठी 2006-07 मध्ये साडे सहा हजार कोटीचा निधी दिला होता.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार कायदेशीर करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, देशातील एकूण 596 ग्रामीण जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना लागू करण्यात येईल. या योजनेसाठी सुरवातीला सोळा हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री पी: चिदंमबरम यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेसाठी वर्ष 2008-09 मध्ये 6866 कोटीची तरतूद केली असून या योजनेसाठी मागील वर्षी वर्षी 5482 कोटी रूपयांचा निधी देण्‍यात आला होता. बजेटमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी 1200 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा