मुंबई वगळता महाराष्ट्रासाठी कोणतीही नवीन रेल्वे किंवा योजना वाट्याला न आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी यावर आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला डावलल्या गेल्याचे ते म्हणाले. लालू यादव यांनी शिवसेना प्रमुखांविरोधात यापुढे कोणतेही वक्तव्य केल्यास ते खपवून घेतले जाणार नसल्याचे ते म्हणाले.