देशाअंतर्गत सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी अत्यंत चोख पार पाडणार्या निमलष्करी दलाच्या सात विभागांसाठीही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे. अर्थमंत्र्यांनी या दलांसाठी 11 हजार 920.77 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
याशिवाय जवानांच्या घरकूल योजनेसाठी 70 कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत. यात निमलष्करी दलाच्या सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एसएनजीसी आदी विभागांचा समावेश आहे.