शिक्षणासाठी 20 टक्के अधिक तरतूद

भाषा

शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (18:34 IST)
देशातील पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर आधी देशात शिक्षणाचा योग्य प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे असल्याचे सांगतानाच
यावर्षी अर्थमंत्र्यांनी, अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 20 टक्के अधिक तरतूद जाहीर केली आहे.

अंगणवाडीच्या कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याच्या घोषणेनंतर अर्थमंत्र्यांनी शिक्षणासाठीचे अतिरिक्त पॅकेज जाहीर केले. यात सर्वशिक्षा अभियानासाठी 13 हजार 100 कोटी, तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणासाठी अर्थात 'मिड डे मिल' या योजनेसाठी 8 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

माध्यमिक शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांनी 4 हजार 554 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत देशातील शिक्षणाचा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा