सामान्यांच्या विरोधी आणि खाजगीकरणाचे समर्थन करणारे रेल्वे बजेट लालू प्रसाद यादव यांनी सादर केल्याची बोचरी प्रतिक्रिया केंद्र सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार्या कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केली आहे.
कम्युनिस्ट पक्षाचे नेते गुरुदास दास गुप्ता यांनीही बजेट विरोधात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे रेल्वे बजेट सामान्य जनतेसाठी निराशाजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.